Blogs

‘ठामपा’मधील कंत्राटी-सफाई कामगारांच्या लढ्याला सक्रीय व जाहीर पाठिंबा

चंगळवादीआत्मकेंद्रितजीवनशैलीमुळेहोणाऱ्यानिर्सगाच्याशोषणाविरुद्धव‘कंत्राटी-कामगार’ प्रथेतीलमानवीशोषणाविरुद्ध‘धर्मयुद्ध’ पुकारणाऱ्या”धर्मराज्यपक्षा”चा‘ठामपा’मधीलकंत्राटी-सफाईकामगारांच्यालढ्यालासक्रीयवजाहीरपाठिंबा…….

घंटागाडी संपामुळे ठाणेशहरवासीयांना होणारा त्रास, हा चिंतेचा आणि आरोग्याच्या दृष्टीनं तर(विशेषतः लहान मुलांच्याबाबतीत) अतिशय काळजीचा विषय आहे, हे निःसंशय! पण, या संदर्भात निदान आतातरी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा तिन्ही बाजुंनी आपण अंतर्मुख होऊन विचार करणार आहोत की, आजवर जे करत आलो, तसचं साप समजून भुई थोपटत बसणारं आहोत?

मुद्दा असा की, औद्योगिकीकरण सुरु होण्याअगोदर आमच्या खेड्यापाड्यामध्ये, ज्या पद्धतीची ‘कचरा’ ही आधुनिक शहरांची समस्या झालेली आहे; तशी कुठलीही समस्या अस्तित्वात असण्याची शक्यताचं नव्हती. घरगुती वापरातील व वापरुन झालेली, ज्याला र्सवसाधारणपणे ‘कचरा’ म्हणून त्याज्य म्हटलं जातं, अशी प्रत्येक गोष्ट किडामुंगी-कोंबडी-कुत्रा-मांजर-पशुपक्षी यापैकी कुणाच्या न् कुणाच्या मुखी पडत होती. फारतर काडीकचरा शेतात छानपैकी कुजून उत्कृष्ट खतात रुपांतरीत होत होता. असं असलं तरी, तेव्हाही मेलेल्या गुरांचं मासं वळण्यासाठी-कातडं सोलून चामडं तयार करण्यासाठी म्हणून, जो समाज ‘अस्पृश्यते’सारख्या अमानुष प्रथेत बंदिस्त होता; आज, तोच समाज आधुनिक शहरांमध्ये

“कंत्राटी-साफसफाई कामगार” म्हणून “नव-अस्पृश्यतेत” बद्ध आहे! आणि याची जाणिव कोणाला  असो वा नसो पण, आम्हाला मात्र त्याची तीव्र जाणिव आहे…..

  • ……..आम्ही ऐषोआरामी व चंगळवादी जिण्यासाठी ठाणे-मुंबई सारखं आधुनिक ‘शहर’ उभारणार आणि या सफाई कंत्राटी-कामगारांसाठी “जीवन एक जहर”…..बनवणारं? आपला हा असा प्रयत्न कधी राहीला आहे का की, या नरकवासात काम करणाऱयांच्या कामातला ‘नरक’ कसा कमी होईल, त्यांना आधुनिक सुविधा देऊन कामाचा ‘ताण’ आणि कामातली ‘घाण’ कशी कमी होईल, त्यांच्या कामाला जास्तीतजास्त यांत्रिकतेची जोड देऊन व सुरक्षित अवजारं-संसाधनं पुरवून या आधुनिक जीवनशैलीनं निर्मिलेल्या या असल्या दुर्दैवी व्यवसायातून माणसांचा सहभाग कसा कमीतकमी राहीलं व कसा जास्तीतजास्त सुरक्षित व समाधानी राहीलं?
  • ज्या आपल्या सारख्या मध्यमवर्गीयांना आज साठलेल्या कचऱ्याच्या ढिगांच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोयं; ती दुर्गंधी या सफाई कामगारांच्या पाचवीला पुजलेली  असते; हे आम्ही कधी ध्यानात घेणार?
  • तेव्हा, हे काम आरोग्यासाठी अत्यंत घातक, धोकादायक व निसर्गदत्त ‘सफाई-दूतांचं’ आहे…… माणसांमधल्या सफाई-पेशातल्या “दुर्दैवी जीवांचं” नव्हे, हे आम्ही कधी समजून घेणारं?….असं असूनही, जर या आधुनिक समाजाला सफाई-कामगारांची गरज भासणारच असेल; तर, त्यांच्यासाठी, चांगल्याचुंगल्या सोयीसुविधा-पगारमान व त्यांच्या स्वतःच्या व कुटुंबियांच्या सर्वकष कल्याणासाठी आरोग्य, शिक्षण व निवृत्तिपश्चात देखभालीच्या उत्तमोत्तम तरतुदी हव्यात……जेणेकरुन या सफाई कामगारांच्या भावी पिढया, इतर लब्धप्रतिष्ठित पेशांकडे वळतील; तसेचं, इतरही उच्चवर्णीय जातबांधवांना हा ‘सफाई-पेशा’ उदरनिर्वाहासाठी पत्करावासा वाटेलं…… या आव्हानाला आणि काळाच्या नितांत गरजेला दुर्लक्षून निदान यापुढे हे रहाटगाडगं चालता कामा नये!

…….ठाणे शहरातील कंत्राटी-सफाईकामगारांच्या या उत्स्फूर्त संपलढ्याचा हा सणसणीत संदेश आहे, एव्हढं निशचित !

……”धर्मराज्य पक्ष” राजनैतिक लाभहानीचा काडीमात्र विचार न करता या, उशिरानं जागं झालेल्या का होईना पण, सगळया लढाऊ सफाई-कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे…. हे आम्ही निक्षून सांगतो !!!

…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *