Blogs

‘लक्ष्मी / बालाजी इंटरप्रायझेस च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवून तुर्भे (नवी मुंबई पोलीसांची २८ नोव्हेंबर २०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार !!!

पोलीस, विशेषत: नवी मुंबईतील पोलीस हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घ्यायला लागलेत हा अनुभव यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन् प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस कायदा आपल्या “खिशात” ठेवत व न्यायालयीन आदेशांची पायमल्ली करत “सद्रक्षणाय् खलनिग्रहणाय’… हे पोलीसी-ब्रीद बाजुला ठेऊन “खलरक्षणाय् सनिग्रहणाय” असं ‘खलनायकी’ वर्तन उघडउघड करू धजावायला लागलेतं, हे सामान्य जनतेच्या दृष्टीनं धोकादायक राजकारणी आणि त्यांनी पोसलेले गुंड… यांच्यासमोर ‘खाकी वर्दी’ गहाण ठेवणारे पोलीस, आमचा ‘कायद्याच्या आधारे जगण्यावरचा विश्वासच जागोजागी उधळून लावायला लागलेत!

कसली घटना… कसले कायदे आणि कसले न्यायालयीन निवाड्यांचे वायदे??? या अशा पोलीसांना कुणीतरी त्यांच्या कानात तप्त शिसं ओतून सांगायला पाहीजे की, ज्या खाकी वर्दी’चा मान भारताच्या राष्ट्रपतींनाही ठेवावा लागतो; ती ‘खाकी वर्दी’ मानली तर संन्याशाच्या भगव्या वस्त्रापेक्षाही पवित्र आहे….. पण, ‘न’ मानली तर ‘चोराची लंगोटी’ आहे!!!

कधि आणि कुठलं आमचं आंदोलन कायदाबाहा पध्दतीनं आम्ही केलयं… ते एकदा या दलातल्या ‘सुपारीबाज’ अधिकाऱ्यांनी जाहीररित्या सांगावं. आमचं आव्हान आहे त्यांना हे त्यांनी सिध्द करूनचं दाखवावं! मुळात, ‘कामगार कायदे’ हे ‘मालक-कायदे’ ‘कामगार आयुक्त’ हा ‘मालक-आयुक्त….. ‘कामगार न्यायालय’ ही ‘मालक-न्यायालय’ आणि ‘कामगार मंत्री’ हा ‘मालक मंत्री असतानाही, आम्ही “पढ नवरा कुंकवाला आधार” समजत आहेत त्या कायद्यांनिशी… आहे त्या परिस्थितीत लढतोय! पण आता तर, ही सगळी व्यवस्था ‘नेसूचं सोडून डोक्याला गुंडाळत’ निरर्गल पध्दतीनं वागायला सरावू लागलीयं ?

पोलीसांचे कामगारांवरचे लाठीमार पॉलीमर प्लॅस्टिकच्या (ज्या रात्री कॅमेन्यात दिसू शकत नाहीत) नव्या लाठ्यांनिशी रात्रीच कसे होतात? थॉमसन प्रेस(२६ जून २०१०) व यश-प्लास्टो (१८ जानेवारी २०१०) येथेही रात्रीचीच वेळ साधून पोलीसांनी कामगारांवर कायदा मोडून केलेल्या लाठीमाराचे वळ अजूनही कामगारांच्या पाठीवर नसले, तरी मनात ताजे आहेत. तुर्भे पोलिसांनी मालकांची सुपारी घेऊन कामगारांना लाठीमार करत हुसकावताना, त्यांचा कॅमेरासुध्दा फोडून टाकण्याची दक्षता घेतली… वा खाकी वर्दीवाल्यांनो वा !!!

राजकारण्यांना आणि बड्या पोलीस अधिकार ‘पैसे चारून’ पोलीसदलात नोकच्या मिळवायच्या आणि निवृत्त होईस्तोवर ‘चोन्या करत खुर्च्या उबवायच्या. हे, भ्रष्ट व अनीतिमान पोलीसांचे धंदे कसे आणि कधि बंद होणार? प्रामाणिक पोलीस कर्मचारी पोलीसदलात अजिबात नाहीत, असं आमचं बिलकुल म्हणणं नाही; त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे! पण, त्यांची संख्या झपाट्यानं रोडावत चाललीय आणि त्यांचा आवाज नुसता क्षीण झालाय असचं नव्हे… तर, तो गल्लोगल्ली पावलोपावली राजरोस दाबला जातोय! हे सगळं फारच चिंताजनक होत चाललयं आणि सहनशक्तिच्या पलिकडे जात चाललयं. या पोलीस अधिकान्यांना आणि पोलीसांच्या खाकी वर्दीआड दडणाऱ्या “शिखंडी” राजकारण्यांना, आमचं खुलं आव्हानं आहे की, .. त्यांनी एकदा जाहीरचं करावं की, भ्रष्टाचार, शोषण व अन्यायाविरुध्द तहहयात झगडणान्या अन्यायग्रस्त व शोषितांसाठी केवळ आणि केवळ “नक्षलवादी” बनणं हाच एकमेव ‘अंतिम पर्याय आहे….. “आखरी रास्ता” आहे!.. म्हणजेच एकदाचा, आमच्यासारख्या कायद्याची बूज राखू पाहणान्यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर व न्यायालयीन लढे, यापुढे लढत बसायचं किंवा कसं याचा, त्यांना तार्किक निर्णय घेता येईल!

छट्टीपणे हसत हसत न्यायालयांचे आम्ही कष्टाने मिळवलेले आदेश बासनात बांधत, स्थानिक व संस्थानिक राजकारण्याच्या इशान्याने मालकांचे पोलीसांनी दलाल बनणं व त्यांच्या हितसंबंधाच कायदा उल्लंघून रक्षणं करणं… हा कामगार आंदोलनांमधला हल्ली रिवाज झालाय! रोह्यात ‘निरलॉन’ कंपनीच्या लढ्यात तेच ठाण्यात (शहापूर-आसनगांव) ‘यश-प्लास्टोच्या आंदोलनात तेच… तळोजा (रायगड) ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज’च्या संघर्षात तेच!. सगळीकडे एक आणि एकच चित्र… फक्त तपशीलात किरकोळ फरक!

चार दिवसांपूर्वी त्या ‘लक्ष्मी इंटरप्रायझेस्’ कंपनीच्या नव्या व्यवस्थापकानं (सनदशीर आंदोलन मोडून काढण्याच्या कामासाठी खास नियुक्त केलेल्या) मालकाच्या मुलाला हाताशी धरून ‘कंपनीच्या गेटवर नव्हे’, तर गेटपासून ५० मीटर दूर हे असले दळभद्री न्यायालयीन आदेशही आम्हाला नाईलाजाने पाळावे लागतात!) शांतपणे बसलेल्या कामगारांवर रात्री गुंडांकडून जोरदार दगडफेक करवली, कामगारांची डोकी फुटली… तर, त्याची धड रितसर तक्रार नोंदवून घ्यायलाही पोलीस तयार नाहीत (कारण हे सगळं त्यांच्या संगनमताखेरीज होऊच शकत नाही!). त्यानंतरचा हा पोलीसांनी जबरदस्तीनं कामगारांकडून तपासणी ‘न’ करवून घेता (संपकरी कामगारांकडून शहानिशा न करताच, औद्योगिक न्यायालयाचा आदेश डावलून) वाटेल ते कंटेनरमध्ये पॅकिंग करून (उदा. यंत्रसामुग्री, अवजारे, कच्चा-अर्धकच्चा माल इ.) पाठवण्याचा हा ताजा घटनाक्रम!

याचा अर्थ… सन्मानानं जगण्यासाठी, पोटासाठी न्याय मिळवण्यासाठी कोणी सनदशीर मार्गानेही लढण्याची हिंमत करायची नाही. तसा कुठलाही मार्गच आम्ही शिल्लक ठेवलेला नाही. …असा या “लुटारू-व्यवस्थेचा हा इशारा आम्ही समजायचा? हे हरामजादे राजकारणी, मालकवर्ग आणि शासकीय अधिकारी स्वतःला समजतात तरी कोण….. याचा, आता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेनं गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपलीयं.

..तरी देखील, अजुनही आम्ही शहामृगासारखे बाहेर विध्वंसकारी वादळ घोंघावत असतानाही वाळूत चोच खुपसून बसणार असू तर फक्त परमेश्वरचं आपलं आणि या आपल्या महाराष्ट्राचं रक्षण करो…कल्याणाची बाब तर दूरच राह्यली!!!

जय महाराष्ट्र ! जय हिंद !!

…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *