महाराष्ट्राचा ‘मानबिंदू’ काव्यमहर्षी ‘कुसुमाग्रजां’च्या जयंतिनिमित्ताने

गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे, मी आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,

मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात देऊन, तुम्ही फक्त लढ तर म्हणा’…..

                                                                  …कवि कुसुमाग्रज

“असा कवि झाला नाहीअसा कवि होणे नाही’’, असं ज्यांचं यथार्थ वर्णन करता येईल, अशा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कवि कुसुमाग्रजांच्या (स्व. वि. वा. शिरवाडकर) येत्या २७ फेब्रुवारीला येऊ घातलेल्या जयंतिनिमित्ताने…. पुन्हा एकवार आम्ही महाराष्ट्राला गर्जून सांगतोयं, “पाठकणा मोडून पडलेल्या मराठी तरूणाईला आणि महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱयांना ताठ मानेनं उभं करण्यासाठीच आला आहे….. “धर्मराज्य पक्ष” !!!

कुसुमाग्रज नेहमी म्हणायचे की, “आपण धरणे बांधली, इमारती बांधल्या, कारखाने बांधले; पण, मने बांधायचे तेवढे विसरलो !!!

कवि कुसुमाग्रजांनी जे जाणले ते हेच की, “…..लोकशाहीत लोकचं जर अशी बेजबाबदारपणे वागत राहीली (विशेषत: निवडणुकीत मतदान करताना) तर, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा करणं; म्हणजे बैला-टोणग्याकडून दुधाची अपेक्षा करणं होयं ! शिवछत्रपती हे काही लोकांनी निवडणुकीत निवडून दिलेले राजे नव्हते. आज अशा मनं विस्कळीत व विपरीत झालेल्या मराठी समाजात जर, शिवछत्रपती जरी जन्माला आले; तर, आजची भरकटलेली मराठी तरूणाई’ ‘भ्रष्टघराणेबाज नेत्यांचा हात धरून त्यांना जय भवानी, जय शिवाजी…. म्हणत, घोड्यासकट गाडेल आणि बाबासाहेब जन्माला आले तर त्यांना, “जय भीम…. म्हणत, अंधाऱ्या कोठडीत डांबेल ! म्हणूनच आम्ही, “धर्मराज्य पक्षा”च्या व्यासपीठावरून प्रथम, “मराठी मनं बांधणी”चा कार्यक्रम हाती घेतलायं. राजकीय वास्तवानुसार या लोकशाहीत, एखाद्या राजकीय पक्षाला सत्तेचा सोपान चढून जाऊन, अंतिम लोकहितार्थ क्रांतिकारक व धाडसी (प्रसंगी सकृतदर्शनी, लोकांना रूचणारे) काही निर्णय घ्यायचे असतील; तर, ते त्यांना अगोदर पक्षाच्या विषय-पत्रिकेवर मांडावे लागतील व त्याबाबत लोकजागृती निर्माण करूनच निवडणुकीत मतं मिळवावी लागतील….. लौकिकअर्थाने, हे जवळपास अशक्यकोटीत पोहोचणारं फार मोठं दिव्यकर्म असलं, तरीही ! नजिकच्या भविष्यात धर्मराज्य पक्षाचे कार्यकर्ते, हे अत्यंत अवघड कार्य पार पाडतील आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य करोडो मराठी माणसांच्या कल्याणाचे, कवतिकाचे व दुव्यांचे धनी होतील, ही ईशचरणी प्रार्थना !! कारण, धर्मराज्य पक्ष, …..केवळ, मतं मिळवण्यासाठी नव्हे; तर, मनं वळवण्यासाठी…. बांधण्यासाठीही आहे !!!

राजन राजे (अध्यक्ष धर्मराज्य पक्ष)